नवी दिल्ली – ‘द काश्मीर फाइल्स’ हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बराच वाद झाला होता. मात्र आता रिलीज होऊन जवळपास आठ महिन्यांनी हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसून येत आहे.
‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार’ सोहळ्यात विवेक अग्निहोत्री यांच्या या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. तसेच, त्यांनी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सर्वांचे आभार देखील मानले आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा 2022 मध्ये वादग्रस्त ठरला होता. हा चित्रपट काहींच्या पसंतीस उतरला तर काहींनी या चित्रपटावर टीका केली. पण तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करत आपला दबदबा कायम ठेवला. आता या चित्रपटाला ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार’ सोहळ्यात ‘गोल्डन फिल्म’ रस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे,” #TheKashmirFiles ला गोल्डन पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल @TheITA_Official यांचे आभार… हा लोकांचा सिनेमा आहे. मी फक्त माध्यम आहे… हा पुरस्कार काश्मीर खोऱ्यातील पंडितांना समर्पित करतो”. असं ते म्हणाले.
View this post on Instagram
दरम्यान, 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे.
काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या वेदना, दुःख आणि संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम या चित्रपटातून झाले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, पुनीत इस्सार यांसारख्या तगड्या कलाकारांच्या भूमिका यामध्ये आहेत.