जामियातील निदर्शकावर भररस्त्यात गोळीबार

नवी दिल्ली : सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या (का) विरोधात जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठापुढे सुरू असणाऱ्या निदर्शनात एकाने निदर्शकावर गोळी झाडली. त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाला होली फॅमिली रुग्णालयात प्राथमोपचार करून त्याला ऑल इंडिया मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आले. गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातातून रक्तस्राव होत होता. त्याच्यासोबतचे निदर्शक त्याला घेऊन रुग्णालयात गेले.

गोळी मारल्यानंतर हल्लेखोर हातातील पिस्तूल दाखवत माघारी फिरला. हा हल्लेखोर “ये लो आझादी’ असे निदर्शकांकडे पाहून ओरडत होता. त्याच्यापासून काही अंतरावर पोलिस उभे होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या निदर्शकांनी राजघाटच्या दिशेने मोर्चा घेऊन जात असताना हा गोळीबार करण्यात आला. जखमी तरूणाची ओळख पटली असून त्यावे नाव शबाद असे आहे.

(याबाबतच्या तपशीलाच्या प्रतिक्षेत आहोत)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.