मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘दीपिका पदुकोण’ आणि भाहुबली स्टार ‘प्रभास’च्या चाहत्यांना एक गुड न्यूज आहे. हे दोन्ही स्टार कलाकार एका चित्रपटात काम करणार आहे. याबाबत वैजयंती फिल्म्सकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे टेंटेटिव्ह टायटल ‘प्रभास 21’ असे निश्चित करण्यात आले आहे.
हा चित्रपट विज्ञान कल्पित शैलीतील असणार आहे. हा चित्रपट निर्माता नाग अश्विन साकारणार असून हा बिग बजेटचा चित्रपट असेल. विशेष म्हणजे या चित्रपटातून दीपिका आणि प्रभास पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. या दोन्ही सुपरस्टार्स एकत्र पाहणे खूप रोमांचक ठरणार आहे.
दरम्यान, या चित्रपटासाठी दीपिकाने तब्ब्ल 20 कोटी मानधन मागितलेअसून, अभिनेता प्रभास 50 कोटी घेत आहे. त्यामुळे दीपिका भारतीय चित्रपटातील सर्वात जास्त मानधन आकारणारी अभिनेत्री बनली आहे. अशी माहिती एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिली आहे. पद्मावतमध्ये दीपिकाने सर्वात जास्त म्हणजे 13 कोटींचे मानधन घेतले होते.
या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होईल आणि 2022 मध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन अद्याप सुरू झालेले नाही. देशातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर चित्रपट निर्मितीचा निर्णय घेण्यात येणार आहे.