राजगर्जना आता १४ ला; मैदान नको रस्त्यावरच दाखवू ताकद

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पुण्यातील पहिली प्रचारसभा बुधवारी अचानक पडलेल्या वादळी पावसामुळे ऐनवेळी रद्द करावी लागली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला होता. मात्र, सभा रद्द झाल्याचे दिसताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली.

दरम्यान, आता राज ठाकरे यांनी रस्त्यांवर सभा घेण्यासाठी संमती द्या अशा आशयाचं पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. ‘परतीचा पाऊस लांबल्याने मैदानांवर मातीचा चिखल होतो आहे. अशा स्थितीत सभेसाठी आरक्षित मैदानांवर प्रचारसभा घेणं अशक्य झालं आहे. म्हणूनच, शहरातील रस्त्यांवर जाहीर सभा घेण्यास निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी’. असं पत्र मनसे तर्फे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं आहे. तसेच, राज ठाकरे यांची पुण्यातील रद्द झालेली सभा येत्या १४ तारखेला (सोमवार) होणार आहे.

पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर मुंबईला रवाना होण्यापूर्वी राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या बरोबर त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे देखील उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here