डॉ. विश्‍वजित कदम भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील

महसूलमंत्री बाळासोब थोरात यांच्या हस्ते डॉ. कदम यांचा अंकलखोप येथे नागरी सत्कार 

सांगली – डॉ. विश्‍वजीत कदम यांच्यात राज्यात नेतृत्व करण्याचे गुण आहेत. ते याच पद्धतीने काम करीत राहिल्यास एकवेळ राज्याचे नेतृत्व रण्याची संधीही त्यांच्याकडे चालून येईल. असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. पलूस तालुक्‍यातील अंकलखोप येथे येथे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांच्या नागरी सत्कारा दरम्यान ते बोलत होते.

यावेळी थोरात यांच्या हस्ते हुतात्मा भगतसिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना थोरात म्हणाले, भाजपला राज्यातील सत्तेपासून दूर ठेवणे ही गरज होती. म्हणूनच आम्ही शिवसेनेसोबत गेलो. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीला अनन्य साधारण महत्व आले आहे. या आघाडीचे देशाच्या राजकारणावर दिसून येत आहेत.

ते म्हणाले, स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्यानंतर राज्याच्या राजकारणात त्यांची जागा कोण घेणार ? डॉ. विश्‍वजीत कदम जबाबदारी समर्थपणे पेलणार का ? याची चर्चा होती. परंतु डॉ. विश्‍वजीत कदम यांनी आता सर्वकाही पेलले आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या पाठोपाठ आता विश्‍वजीत कदम यांची नाळ तळोगाळातल्या लोकांशी जोडली गेली आहे.

महापुरात उतरून त्यांनी लोकांसाठी केलेल्या कामाची पोहोचपावती लोकांनी त्यांना दिली असल्याचे सांगून त्यांनी मंत्री डॉ. कदम यांना दिल्लीत जाण्याची तयारी ठेवण्याचेही यावेळी सांगितले.
शावेळी मंत्रीडॉ कदम म्हणाले, महापूरात भाजप सरकार आंधळे मुके व बहिरेही झाले होते.

परंतु शासनाच्या कोणत्याही मदतीची वाट पाहत न बसता महापूरग्रस्तांना मदत केली. अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजांकडे लक्ष दिले. त्यामुळेच लोकांनी मला साथ दिली. येथून पुढे देखील प्रमाणीकपणे जनतेची सेवा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, इंद्रजित मोहिते, बाळासाहेब पवार, रावसाहेब पाटील, महेंद्र लाड उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.