भोपाळ : मध्य प्रदेशातील अलिराजपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जी आजही आधुनिक समाजाचे दावे खोटे असल्याचे दाखवून देते. एका मुलाशी फोनवर बोलल्याच्या कारणावरून मुलीला तिच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याची घटना अलिराजपूरमधील सोंडवा भागात घडली आहे.

हि मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती मिळते आहे. ती मुलांशी फोनवर बोलते म्हणून तिच्या कुटुंबातील सदस्यांनी मारहाण करीत मुलीचे केस कापून टाकले आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी बब्बर यांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबातील सदस्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.