नवी दिल्ली : जखमी अवस्थेत खाली पडलेल्या तरूणांना पोलिसांनी जबरदस्तीने राष्ट्रगीत म्हणायला लावले. याचा व्हायरल झालेल्या व्हिडिओ फितीतील तरूणाचा मृत्यू झाला. त्याची ओळख पटली असून उत्तर दिल्लीतील करदमपुरी भागातील रहिवासी असणारा फैजन असे त्यांचे नाव आहे.
मंगळवारी पाच जण जखमी होऊन खाली पडले होते. एक पोलिस येतो. त्यांना त्या अवस्थेत राष्ट्रगीत÷म्हणायला लावतो. नंतर वंदेमातरमची घोषणा देण्यास भाग पाडतो, अशी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. फैजन याला मेंदूवरूल शस्त्रक्रियेच्या वॉर्डात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर मंगळवारी गोळी झाडण्यात आली होती. त्याचा गुरूवारी मृत्यू झाला. त्याला आणले त्यावेळीच त्याची प्रकृती चिंताजनक होती.
दरम्यान गुरू तेजबहादूर रुग्णालयात दाखल केलेल्या चार रुग्णांनी शुक्रवारी प्राण गमावले. त्यामुळे मृतांची संख्या 42 वर पोहोचली आहे. या हिंसाचारत 250 जण जखमी झाले होते.