दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2021 साली होणाऱ्या महिलांच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे. या
स्पर्धेत भारतीय संघाला पात्रताफेरीत खेळावे लागणार असून त्यांचे गुण ग्राह्य धरले जाणार असून त्यानंतरच त्यांना मुख्य स्पर्धेत पात्रता मिळेल.
न्यूझीलंडमध्ये 6 फेब्रुवारी ते 7 मार्च 2021 या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून त्यात यजमान न्यूझीलंडसह गतविजेता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ मुख्य स्पर्धेत थेट पात्र ठरले आहेत. भारतीय संघाला पाकिस्तानसह पात्रता फेरीत खेळावे लागेल.
The full fixture list for next year’s ICC Women’s Cricket World Cup in New Zealand.
Less than 11 months to go until the tournament opener!#CWC21 pic.twitter.com/nc6oWjVjAF
— Cricket World Cup (@cricketworldcup) March 10, 2020
येत्या जुलैमध्ये श्रीलंकेत विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने होणार असून त्यातून अव्वल गुण मिळविणारे 4 संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. या स्पर्धेसाठी आयसीसीने महत्त्वपूर्ण बदल केला असून आता उपांत्य तसेच अंतिम लढतीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.