बॉलीवूडमधील बेबो अर्थात करीना कपूर-खानच्या दुसऱ्या मुलाचा पहिला फोटो जन्मानंतर 4 महिन्यांनी समोर आला आहे. या फोटोत करीना कपूर-खान आपल्या गोंडस मुलाला कपाळावर चुंबन देताना दिसत आहे. मानव मंगलानी यांनी हा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करत मानवने लिहिले की, “आई करीना कपूर-खानसोबत क्यूट लिटल जेह.’ अभिनेत्री करीना कपूर-खानच्या मुलाच्या जन्मापासूनच त्याचे नाव आणि त्याची छायाचित्रे मीडियापासून लपवली गेली होती.
आता पहिल्यांदाच करीनाचा दुसरा मुलगा “जेह’ याचा फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावरील चाहते करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या क्युटनेसचे तोंडभरून कौतुक करत आहेत. या पोस्टवर असंख्य चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
तसेच फोटोच्या अँगलवर प्रश्नचिन्ह लावले आहेत. एका युझरने लिहिले, “तरीही हा फोटो स्पष्ट नाही. परंतु दुसऱ्या मुलाबरोबर असे केले जात नाही.’ अन्य एका युझरने पोस्ट केली की, “तो तैमूरसारखा दिसत आहे.’ तैमूर आणि जेहच्या चेहऱ्यातील साम्यतेबद्दल इतरही बऱ्याच जणांनी कमेंटस् केल्या आहेत.