मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून काही महिन्यात पूर्वी राजकारण चांगलेच तापले होते. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. पूजाचे त्यांच्यासोबत संबंध होते, असे देखील म्हटले गेले. या आरोपामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर, आता पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे जबाब नोंदविला असल्याची माहिती समोर आली आहे.
यातच आता पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदविला आहे, ते म्हणाले, ‘आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही.’ असा जबाब त्यांनी झोन पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.
पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी दिलेल्या या जबाबामुळे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना या प्रकरणातून एकाप्रकारे क्लिन चिट मिळाल्याचेच स्पष्ट होत असून, येत्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.