‘बाप रे बाप’ …एक से भले दो, दो से भले तीन

मुंबई- बाॅलीवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’ याने आपल्या आगामी ‘बाप रे बाप’ या सिनेमा ची पहिली झलक सोशल मीडियावर प्रदर्शित केली आहे. हा चित्रपट एक  कॉमेडी – मसालेदार सिनेमा असणार आहे. अक्षय ने शेअर केलेल्या फोटोत, अक्षयचे 3 वेगवेगळे लूक दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

Ek se bhale do, do se bhale teen…Baap Re Baap, A Masaledaar entertainer coming your way soon. Watch out ! #BaapReBaap

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on


दरम्यान, शेअर केलेल्या फोटोतील पहिला लूक हा शर्ट आणि पॅन्ट घातलेला तरुण, दुसरा लूक हा कुडता, नेहरू जॅकेट आणि चष्मा घातलेला चाळीशीतला व्यक्ती तर तिसरा लूक हा वयोवृद्ध व्यक्ती असा आहे. तिसरा लूक हा अक्षयचा कुमारचा जुना चित्रपट ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ मधील अक्षयच्या वडिलांच्या भूमिकेशी मिळता जुळता आहे. तसेच ट्विटरवर चित्रटाचा फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे की, एक से भले दो, दो से भले तीन…..बाप रे बाप, एक मसालेदार मनोरंजन लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. नक्की बघा!

 

View this post on Instagram

 

Say goodbye to jams with #FASTag! Watch this ad to know more. #TransformingIndia @morthindia @gadkari.nitin

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on


अक्षय शेवटचा दिग्दर्शक राज मेहता यांच्या गुड न्युज या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अक्षयने अभिनेत्री करिना कपूर-खान, अभिनेत्री कियारा अडवानी आणि अभिनेता दिलजीत दोसांझ बरोबर स्क्रीन शेअर केली होती. आता तो दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सुर्यवंशी’ आणि राघव लॉरेन्सच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. सुर्यवंशी चित्रपट 27 मार्चला तर लक्ष्मी बॉम्ब 22 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.