पुणे पोलिसांच्या अशाही ‘हटके’ शुभेच्छा

पुणे : व्हॅलेन्टाईन डेनिमित्त सर्वत्र गुलाबी रंग चढला असताना, पुणे पोलिसांनीही अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर या ट्वीटची जोरदार चर्चा होत आहे.

गेल्या काही दिवसांत सायबर क्राइम वाढल्याच्या तक्रारी सातत्यानं होत आहेत. त्यामुळे जनजागृती आवश्यक आहे. पासवर्ड हॅक करणं, चोरणं, रक्कम लंपास करणं अशा घटना घडत आहेत. हाच धागा पकडून पुणे पोलिसांनी जनजागृतीचा प्रयत्न केला आहे.

“प्रेम शेअर करा, पासवर्ड नाही” अशा शुभेच्छावजा सल्ला ट्वीटरद्वारे पोलिसांनी दिला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं पोलिसांनी दिलेल्या या शुभेच्छा चांगल्याच चर्चेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.