आंबेठाण -श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे सोमवारी (दि. 15) रात्री एका व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, तो पिंपरी-चिंचवड येथे कामानिमित्त ये-जा करीत होता. तर 15 दिवसांपूर्वीच त्याचे लग्न झाले असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संबंधिताच्या कुटुंबातील 5 जणांचे स्वॅब तपासणी पाठवण्यात आले असून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर खबरदारीचे उपाय म्हणून रुग्ण राहणारा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
तरी नागरिकांनी घाबरू न जाता स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्यावी, तसेच प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन तलाठी शाम वालेकर यांनी केले आहे.