VIDEO: एका जिद्दी कलाकाराचा विलक्षण प्रवास…

कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कलाकार हा कलेचा उपासक असतो, असं म्हणतात की कलेला कोणतचं बंधन नसतं. कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा ही कला आणखीनच बहरत जाते. चला तर मग पाहूयात अशाच एका जिद्दी कलाकाराचा हा विलक्षण प्रवास…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारामती तालुक्यातील गुणवडी गावात मनोज कुंभार हा दिव्यांग कलाकार राहतो. मनोजच्या घरी परंपरागत गणेशमूर्ती घडवण्याचा व्यवसाय आहे. त्याला जन्मत : दोन्ही हाताला बोटे नाहीत, मात्र तरीही कोणत्याही साच्याचा वापर न करता तो सुरेख गणेशमूर्ती घडवतो. गणेशमूर्ती साकारताना त्याला पाहणं म्हणजे एक विलक्षण अनुभव असतो. त्याची ही जिद्द आणि मेहनत धडधाकट असणाऱ्या सामान्य माणसाला लाजवणारी आहे.

मनोज यांनी एसटीडी सिटी हा अभ्यासक्रम पूर्ण केलायं. शिवाय मॉर्डन आर्टमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलयं. ते सध्या बारामतीच्या एका खासगी विद्यालयात कला शिक्षक पदावर  नोकरी करत आहेत. मूर्ती बनवण्याच्या कामात त्यांना आई, वडिल आणि पत्नी यांची मदत होते. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनवल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवास प्राधान्य मिळेल असा विश्वास मनोजने व्यक्त केलायं. यासाठी शासनान मातीवर लावलेला जीएसटी खर्च कमी करावा,अशी मागणी देखील त्याने केलीयं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)