वाघोली- काळभैरवनाथ पॅनेल प्रमुख व आरटीआय कार्यकर्ते किशोर शंकर सातव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर पक्षाकडून पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव रासाई येथे किशोर सातव यांनी कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. सातव यांनी मनसे हवेली तालुकाध्यक्षपदाची धुरा काही काळ सांभाळली होती. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनेल उभारून कडवी झुंज दिली होती. पक्षाची ध्येय धोरणे राबवून काम करणार असल्याचे किशोर सातव यांनी सांगितले.