संपूर्ण लक्ष्मी रस्ता आता “सी वॉच’च्या नजरेत

ऑगस्टअखेर अंमलबजावणी : गुन्हेगारी रोखण्यासाठी व्यापाऱ्यांचा सहभाग
पुणे – व्यापाऱ्यांच्या मदतीने पुणे पोलीस संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावर “सी वॉच’ प्रकल्प राबवत आहे. यामुळे हा सर्व परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहे. यामुळे गुन्हेगारीला प्रतिबंध तसेच घडलेल्या घटनांवर लक्ष ठेवणे हा प्रयत्न राहणार आहे.

या संदर्भात अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये 30 ते 40 जण सहभागी झाले होते. त्यांना मोराळे यांनी “सी वॉच’ प्रकल्पाबाबत माहिती दिली. या प्रकल्पामुळे शहरातील उघडकीस आलेल्या गुन्ह्यांबद्दल त्यांनी माहिती दिली.

तापकिर गल्लीत व्यापाऱ्याचे हरवलेले सहा लाख रुपयेदेखील “सी वॉच’ प्रकल्पामुळे पुन्हा मिळाले. यामुळे जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लक्ष्मी रस्त्यावरील सर्व कापड व्यापाऱ्यांनी दुकानासमोर ऑगस्टअखेर कॅमेरे बसविण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. बैठकीत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राहुल बोरा, राज भंडारी, अजित पटेल, राजेश शेरवानी आदी हजर होते. यावेळी फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कलगुटकर हजर होते.

व्यापाऱ्यांनी दुकानासमोर लावलेले कॅमेरे जिओ तंत्रज्ञानाद्वारे पोलिसांच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला जोडले जातील. हे कॅमेरे रस्त्यावर तसेच दुकानासमोर घडलेल्या घटना टिपतील अशा प्रकारे लावण्यात येणार आहेत.

-किशोर नावंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)