पुणे – भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दि पूना मर्चंट्स चेंबरची द्विवार्षिक (2019-21) निवडणूक शुक्रवारी झाली. यामध्ये चेंबरचे विद्यमान अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठिया, वालचंद संचेती यांच्यासह 15 जण निवडून आले. यातून आता अध्यक्षांची निवड होणार आहे.
या निवडणुकीत पोपटलाल ओस्तवाल यांच्या नेतृत्त्वाखालील उत्कर्ष पॅनेलचे 10 उमेदवार विजयी झाले आहेत. 526 पैकी 486 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 467 मते वैध ठरली. तर, 19 मते अवैध ठरली. यासाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून ऍड. हरिदास गुजराथी, ऍड. सुभाष किवडे आणि चेंबरचे कार्यालयीन सचिव विजय दामले यांनी काम पाहिले.
विजयी उमेदवार आणि कंसात मते : राजेंद्र बाठिया (437), जवाहरलाल बोथरा (420), प्रवीण चोरबेले (419), विजय मुथा (402), अजित बोरा (400), अनिल लुंकड (399), अशोक लोढा (389), प्रकाश नहार (380), रायकुमार नहार (365), वालचंद संचेती (342), ईश्वर नहार (332), गिरीश कटारिया (326), विजय नहार (295), गणेश चोरडिया (291) आणि पोपटलाल ओस्तवाल (291) यांचा विजय झाला आहे.