लातूर होतंय शैक्षणिक हब; आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र लवकरच लातूरात

लातूर – नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र लातूर येथे होणार आहे. राज्य सरकारने त्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

लातूर हे शैक्षणिक हब म्हणून विकसित होत असून या निर्णयामुळे त्याला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अमित देशमुख हे याच जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. तसेच विविध विभागाची किमान 25 ते 30 कार्यालयेही लातूर परिसरात आणण्यात आली आहेत.

नाशिकला आरोग्य विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर त्या विद्यापीठाची पाच विभागीय कार्यालये आत्ता पर्यंत मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपुर आणि कोल्हापुर येथे उभारण्यात आली आहेत. मराठवाड्याचे विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे असले तरी आता या कार्यालयाचे विभाजन होणार आहे. काही भाग आता लातूर विभागाकडे जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.