डिजिटल यंत्रणा ठरतेय फायद्याची

पुणे – विधानसभा निवडणुकावेळीही बहुतांशी मतदान केंद्रावर वोटर्स स्लिप देण्यासाठी बहुतांश राजकीय पक्षाकडून एका छोट्या यंत्राचा वापर करण्यात येत होता.

यंत्राची किंमत साधारणपणे 9 हजार रुपये आहे. काही ठिकाणी वोटर्स स्लिप देताना तेथील कार्यकर्ते मतदाराचे नाव विचारून ते मोबाइलमध्ये टाइप करत होते. ऍपच्या माध्यमातून वोटर्स स्लीप देणारे यंत्र जोडण्यात आले होते. त्यानंतर एका मिनिटात पोलिंग स्लिप मिळत होत्या. त्यामुळे याठिकाणी मतदारांची फारशी गर्दी दिसून आली नाही.

त्याचबरोबर एका दुसऱ्या मतदारसंघात तर मतदाराला त्याचे नाव त्या यंत्रात उच्चारण्यास सांगण्यात येत होते. मतदारांनी आपले नाव उच्चारले, की या यंत्रातून लगेच पोलिंग स्लिप मिळत होती. त्यामुळे अशा ठिकाणी गर्दी नव्हती. त्यानंतर जे मतदार पोलीस स्लिप घेऊन गेले त्यांच्या छायाचित्रासह माहिती या कार्यकर्त्यांकडे होती आणि त्या आधारावर ते किती मतदान झाले याची टॅली करत होते. हे यंत्र कसे वापरावे याबाबत कार्यकर्त्याना चांगले प्रशिक्षण देण्यात आले होते.

निवडणूक आयोग मतदान यंत्रासह मतदानाची आकडेवारी सांगण्यासाठी बरीच डिजिटल यंत्रणा वापरत आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षांनीही अशा प्रकारची यंत्रणा वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या राजकीय पक्षांना किती मतदारांनी मतदान केले, त्या आधारावर मतदानाच्या रात्रीच आपल्या निकालाविषयी अंदाज घेण्यास मदत मिळणार होती.

Leave A Reply

Your email address will not be published.