पावसाच्या पाण्यात अडकली स्कुलबस; विद्यार्थी सुखरूप

पुणे – सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने धानोरी-लोहगाव रस्त्यावर साठे वस्ती येथे पाणी साचले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहने या पाण्यात अडकत आहेत. पाच वाहने या पाण्यातून ट्रॅक्टरच्या साह्याने बाहेर काढण्यात आल्या. या पाण्यात एक स्कूल बसही अडकली होती. यामधून विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसमध्ये बसविण्यात आले.

रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक बंद होती. तरीही वाहनचालक जोखीम पत्करून वाहने या पाण्यात घालत होती अनेक विद्यार्थ्यांना यामुळे शाळेला सुट्टी करावी लागली तर नोकरदारवर्गाला कामावर जाण्यास उशीर झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.