कापूरहोळ परिसरात टक्‍का वाढला

पंचक्रोशीत मतदान प्रक्रिया शांततेत

कापूरहोळ – कापूरहोळ पंचक्रोशीत भोर,वेल्हे,मुळशी विधानसभा निवडणुकीसाठी आज मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान सरासरी 10 टक्के पार पडले, चार वाजेपर्यंत ही टक्केवारी 65 टक्के पर्यंत गेली तर 6 नंतर सरासरी 73 टक्केवर गेली.

यावेळी तरुण युवकांनी मतदानावर जास्त भर दिला. वयोवृद्ध नागरिकांना कार्यकर्त्यांनी स्वतः वाहनाने मतदान केंद्रावर आणले व पुन्हा घरी सोडले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. सहकारी बॅंका, सोसायटीच्या वतीने तसेच शासकीय पातळीवर व सोशल मीडियावर मतदान करण्यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती केली होती.

गावनिहाय टक्केवारी – शिंदेवाडी 73.60, ससेवाडी 82.53 वेळू 82.00, कासुर्डी खे.बा. 72.08, रांजे 83.00, कुसगाव 80.70, खोपी 79.63, शिवरे 73.96, वर्वे खु. 73.50, कांजळे 82.46, साळावडे 93.07, केळवडे 88.63, कांबरे खे. बा. 78.93, कुरंगवडी 69.45, पारवडी 75.18, सोनवडी 70.07, वाठार 69, निगडे 74.88, कापूरहोळ 73, न्हावी 66.33, भोंगवली 71.94, मोरवाडी 72.68, करंदी खे.बा. 80, राजापूर 77.82, हरीचंद्री 72, दिवळे 75.40, नसरापूर 70 निगडे 74.8

मतदार संघात युवक मतदारांचा टक्का वाढला असून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला साथ देतील. तरुण युवक जागृत झाला असुन परिवर्तन अटळ आहे – कुलदीप कोंडे, उमेदवार, शिवसेना

Leave A Reply

Your email address will not be published.