बहुमत मिळाले नाही तर प्लॅन बी आहे ‘तयार’? अमित शहांनी दिलं उत्तर

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होत आहे. मतदानाच्या चार टप्प्यांनंतर गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ‘भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या चार टप्पातच बहुमत मिळाले आहे. आता फक्त 400 पार करायचे आहे. विरोधी पक्ष आमच्या दाव्यांवर नक्कीच खिल्ली उडवत आहे, पण शहा यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे की, पीएम मोदी प्रचंड बहुमताने पुनरागमन करणार आहे.
शहा यांचा काय आहे ‘प्लॅन बी’
वृत्तमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी सांगितले की, ‘जर बहुमत मिळाले नाही तर, आमचा प्लॅन बी तयार आहे. प्लॅन ए यशस्वी होण्याची शक्यता 60 टक्क्यांपेक्षा कमी असताना प्लॅन बी आवश्यक आहे. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, पंतप्रधान मोदी प्रचंड बहुमताने परतणार आहे. याआधीही शाह यांनी अनेक मुलाखतींमध्ये पीएम मोदी देशाचे पुढचे पंतप्रधान होणार आहेत, 2029 च्या निवडणुकीतही ते भाजपचा चेहरा असणार आहेत. असे म्हटले आहे.
दक्षिणेत भाजपला काय आशा?
दक्षिण भारतातील राजकारणाबाबतही विचारण्यात आले. अखेर तिथून भाजपला किती फायदा होऊ शकतो, काँग्रेसच्या रणनीतीबाबत त्यांची मते काय आहे, या पैलूंवरही सविस्तर माहीत शाह यांनी दिली आहे. ‘जर कोणी म्हणत असेल की हा वेगळा देश आहे, तर तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. आता या देशाची कधीही फाळणी होऊ शकत नाही. काँग्रेस पक्षाच्या एका प्रमुख नेत्याने उत्तर आणि दक्षिण भारताचे विभाजन करण्याविषयी बोलले आणि काँग्रेस पक्ष हे नाकारत नाही. काँग्रेस पक्षाचा अजेंडा काय आहे याचा विचार देशातील जनतेने करायला हवा. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या पाच राज्यांचा समावेश करून भाजप या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा प्रतिस्पर्धी बनणार आहे.’
हे वाचले का ?ममता बॅनर्जींचा यू-टर्न ; म्हणाल्या,”इंडिया आघाडीचा आम्हीदेखील एक भाग”





