पुणे – नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास न्यायालयाने 20 वर्ष सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड भरल्यास रक्कम पीडितेला देण्यात यावी. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी आदेशात म्हटले आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2016 दरम्यान मुलीच्या घरात हा प्रकार घडला. याबाबत 15 वर्षीय मुलीच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी पाहिले. त्यांना सरकारी वकील संध्या काळे आणि अरुंधती ब्रह्मे यांनी मदत केली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. पी. कुलथे यांनी या गुन्ह्याचा तपास केला.
मुलीची आई ही दिव्यांग आहे. तसेच ती आजारी असल्याने मुलीने हा प्रकार घरी सांगितला नव्हता. असे फिर्यादीत नमूद आहे. खटल्याची सुनावणी सुरू असताना मुलीने फितूर होण्याचा प्रयत्न केला होता. सरतपासणीमध्ये तिने तिच्यावर झालेला अत्याचार न्यायालयास सांगितला. मात्र उलट तपासणीमध्ये तिने तिचे वय जास्त आहे, आरोपीचे नाव चुकीचे आहे, असे न्यायालयात सांगितले. त्यावर अतिरिक्त सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी युक्तिवाद केला की, “मुलीने ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखले होते. आरोपीला टोपण नाव असू शकते.