चीन मध्ये अजूनही आहे करोनाचे अस्तित्व

चौदा नवीन स्थानिक रूग्ण आढळले
बिजींग : चीनने करोनावर मात केल्याचे चित्र निर्माण केले होते व करोनासाठी उभारण्यात आलेली स्वतंत्र हॉस्पीटल्सही बंद करून टाकली होती. पण अजूनही चीन मध्ये करोनाच्या स्थानिक केसेस आढळून येत आहेत.

आज तेथे एकूण 14 नवीन स्थानिक केसेस आढळून आल्याने तेथील वैद्यकीय यंत्रणांचे धाबे दणाणले आहे. चीन मध्ये स्थानिक लोकांना करोनाची लागण होण्याचे प्रकार पुर्ण थांबले होते केवळ विदेशातून मायदेशी परत आलेल्यांमध्ये करोनाचे प्रमाण आढळून येत होते. त्यामुळे करोना रूग्णांसाठीचे स्पेशल वार्ड व हास्पीटल्सही त्यांनी बंद केली होती. पण आता तेथे पुन्हा हे रूग्ण आढळून येऊ लागले आहेत.

चीन मध्ये करोनामुळे आत्तापर्यंत एकूण 4633 लोक मरण पावले असून तेथे एकूण 82877 जणांना करोनाची लागण झाली होती. त्यातील बहुतांशी रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र त्यापैकी 531 जणांवर तेथे अजून उपचार सुरू आहेत. अशातच पुन्हा नवीन रूग्ण सापडून येऊ लागल्याने वैद्यकीय यंत्रणा पुन्हा सक्रिय करावी लागणार आहे. चीन मध्ये विदेशातून आलेल्या 1672 नागरीकांना करोनाची बाधा झाली असल्याचे दिसून आले आहे. त्यातील 451 जणांवर विविध रूग्णालयांत अजून उपचार सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.