मुंबई – देशासह विविध राज्यांमधील वातावरण देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी चांगले नाही. गोव्यात स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे निवडून येणे अवघड आहे. आगामी निवडणूकीत भाजपला गोव्यात बहुमत मिळणार नाही. कॉंग्रेस हाच गोव्यात सर्वात मोठा पक्ष असेल, असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
संजय राऊत म्हणाले, गोव्यात आम्ही कमी पडलो हे मान्य आहे, पण येणाऱ्या काही वर्षात शिवसेनेचा पणजीत आमदार असेल हे तुम्हाला मी विश्वासाने सांगतो. तसेच देवेंद्र फडणवीस हे गोवा राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. राज्य छोटे आहे, जबाबदारी मोठी आहे. म्हणून माझ्या त्यांना शुभेच्छा असल्याचे म्हणत त्यांना टोला लगाविला.
तसेच आप आणि तृणमूल कॉंग्रेस या दोन्ही पक्षांवर भाजपची बी टीमचा असल्याचा आरोप होत आहे. असू शकते, कारण दोन्ही पक्षांची येथे ताकत नाही. पण मतांचे विभाजन झाले, तर निश्चित भाजपला फायदा होईल, म्हणून सगळ्यांनी मिळून त्याचा विचार केला पाहिजे, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.