दिवसभरात 1006 रुग्ण
पुणे – सलग दुसऱ्या दिवशीही शहरात करोना बाधित संख्येने एक हजाराचा टप्पा गाठला आहे. आज (दि. 9) दिवसभरात तब्बल 1 हजार 6 नवीन बाधित सापडल्यामुळे शहराची चिंता वाढली असून बाधितांची एकूण संख्या 25 हजार 174 वर जाऊन पोहोचली आहे. दिवसभरात करोनामुळे 16 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
एकीकडे बाधितांची संख्या वाढत असताना अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढतच आहे. बुधवारी (दि.9) दिवसभरात 3 हजार 929 जणांचे स्वॅब घेण्यात आले. तर 755 जणांची रॅपीड अँटिजेन टेस्ट करण्यात आली.
तब्बल 4 हजार 684 पर्यंत तपासणी क्षमता गेली असून लवकरच दिवसाला पाच हजार तपासणी होणार आहेत. दरम्यान, शनिवारी दिवसभरात 581 जण करोनामुक्त झाले असून, बरे होऊन घरी गेलेल्यांच्या संख्येनेही 15 हजार 579चा टप्पा पार केला आहे. तर, 15 हजार 831 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.