येरवडा (प्रतिनिधी)- भामा-आसखेड प्रकल्पाची संपूर्ण पाहणी वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी केली. या प्रकल्पात असलेल्या जलशुध्दीकरण केंद्र (WTP), कुरुळी ,BPT (ब्रेकींग प्रशर टैंक) टैंकचे व भामा आसखेड धरणाच्या जॅकवेल पंपहाऊसची पाहणी आमदार सुनिल टिंगरे यांनी केली.
केळगाव येथील १.१ कि.मी पाईपलाइनचे काम अनेक वर्षे बंद होते, सुनिल टिंगरे यांनी दिनांक २९/०५/२०२० रोजी कौन्सिल हाॅल, पुणे येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भामा आसखेड प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी विनंती केली होती.
या अनुषंगाने दिनांक ०६/०६/२०२० उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकी मध्ये भामा आसखेड धरणाच्या कालव्यासाठी आरक्षित केलेल्या जमिनींच्या सातबारा उतार्या वरील शेरे काढण्याचे आदेश खासदार डाॅ अमोल कोल्हे, सुनिल टिंगरे व आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत दिले होते.
या मुळे केळगाव मधील १.१ कि.मीचे रखडलेले काम ही वेगाने चालू आहे. “भामा आसखेडचे पाणी लवकरच वडगावशेरी मतदारसंघात येईल व गेले दहा वर्षा गंभीर असलेला पाणी टंचाईच्या प्रश्न लवकरच माननीय उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून मार्गी लागेल” असे सुनिल टिंगरे यांनी सांगितले.