अर्थसंकल्प म्हणजे देशाची दिशाभूल- जलील

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थमंत्री निर्मता सीतारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आकडे दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, भाजपला सत्तेत येऊन 6 वर्षे झाली असून, त्यांनी काय कामे केली हे सगळ्यांना माहित आहे. देशात नागरिकांच्या आरोग्य आणि रुग्णालयाची अवस्था काय? शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सरकार कामाचे आकडे फुगून दाखवते आहे, मात्र स्थनिक पातळीवर काय काम केले जातात हे जनतेला चांगलेच माहित असल्याचे जलील म्हणाले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.