लंडन – करोनाग्रस्त झालेले ब्रिटिश पंतप्रधान आता या आजारातून पूर्ण बरे झाले असून ते आज पासून त्यांच्या कामावर रूजू झाले आहेत. 55 वर्षीय बोरीस जॉन्सन यांना रुग्णालयातून 12 एप्रिललाच डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांना करोना झाल्याचे 27 मार्च रोजी निष्प्पन्न झाले होते. पण त्यांना नियमानुसार तेथे विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्या कालावधीत विदेश मंत्री डॉमनिक राब यांनी देशाचा काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कारभार सांभाळला.
बोरीस जॉन्सन यांनी सोमवारी लगेच आपल्या मंत्रिमंडळाचीही बैठक बोलावली आहे. ते आता पूर्णवेळ आपला कारभार बघु शकणार आहेत. ब्रिटन मध्ये अजूनही करोनाची साथ मोठ्या प्रमाणावर कायम असून तेथे करोनामुळे आत्तापर्यंत 20 हजार 732 लोक दगावले आहेत. काल रविवारीही एका दिवसात तेथे 413 जणांचे मृत्यू झाले होते.