मुंबई – बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर दुस-याच दिवशी सदाबहार अभिनेता ऋषी कपूर यांचेही निधन झाले. या दोन्ही कलाकारांची फॅन फॉलोइंग खूप मोठी असून दोघेही कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराने मरण पावले आहेत. एका दिवसाच्या अंतरातच बॉलिवूडमधील दोन बड्या सिताऱ्यांच्या अकस्मात निधनाने बॉलिवूड आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या दोन्ही स्टार्सच्या मृत्यूबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. यातच अमिताभ बच्चन यांनी सुद्धा एक खास ट्विट केले आहे.
T 3518 – The death of an elder celebrity vs death of a younger .. the grief of the latter more intense than that of the former .. why ..?
Because you lament the loss of opportunity in the latter .. the
unrealised possibilities pic.twitter.com/IoaJxeYOiQ— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 2, 2020
“आपल्याला ज्येष्ठ कलाकारापेक्षा तरुण कलाकाराच्या मृत्यूचे अधिक दुःख का होते? असा एक प्रश्न डोक्यात आला होता, कदाचित तरुण कलाकाराचा मृत्यू झाल्याने त्याला पुढे मिळू शकणाऱ्या संधी सुद्धा गमवाव्या लागतात त्यामुळे आपल्याला अधिक दुःख होते” अशा आशयाचे अमिताभ यांचे ट्विट आहे. या ट्विट सोबतच त्यांनी इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या सोबतचे फोटो सुद्धा जोडलेले आहेत.
इरफान खान आणि ऋषी कपूर हे दोघेही 2018 पासून कॅन्सरशी लढत होते. ऋषी कपूर यांना Lyukemenia तर इरफान खान याला Neuroendocrine Tumor चा आजार होता, मध्यंतरी या दोघांचीही प्रकृती बरीच सुधारली होती. मात्र अचानक तब्येतीत बिघाड आल्याने इरफान खान यांचा 29 एप्रिल रोजी तर ऋषी कपूर यांचा 30 एप्रिल रोजी मृत्यू झाला. इरफानचे वय 54 वर्ष तर ऋषी कपूर यांचे वय 67 वर्ष होते. दोघांचेही जाणे तितकेच चटका लावून जाणारे होते मात्र इरफानला आयुष्यातील पुढील संधी गमवाव्या लागल्या याचे अधिक दुःख होत आहे अशा आशयाच्या भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केल्या आहेत.