मुंबई – बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अतिशय हरहुन्नरी आणि अष्टपैलु अभिनेता अशी इरफान यांची ओळख होती.
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर इरफान यांचा मुलगा ‘बाबिल’ याने सोशल मीडियावर वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं मन भरून आलं आहे. या व्हिडीओत इरफान पाणीपुरीचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहे. “जेव्हा तुम्ही बराच काळ डाएटवर असता आणि शूट संपल्यानंतर तुम्ही पाणीपुरी खाता..” असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे.
View this post on Instagram
When you’re on diet for so long and then the shoot ends and you can have pani puri.
View this post on Instagram