#IPL2022 | बीसीसीआयला 37 हजार कोटींचा नफा मिळण्याची शक्‍यता

नवी दिल्ली –  आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमापासून आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी बीसीसीआयने प्रक्षेपण हक्कांच्या निविदा मागवल्या आहेत. या करारातून बीसीसीआयला तब्बल 37 हजार कोटी रुपये मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

सध्या हे हक्क स्टार इंडियाकडे असून, त्यांच्याकडून बीसीसीआयला 16 हजार 347 कोटी रुपये मिळतात. नव्या करारांत ही रक्कम जवळपास दुप्पट होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत दोन नवे संघ दाखल होणार आहे. या संघांच्या खरेदीसाठी बीसीसीआय लवकरच लिलावाचे आयोजन करणार आहे. या दोन नव्या संघांपैकी एक संघ विकत घेण्यासाठी मॅंचेस्टर युनायटेड संघाचे मालक असलेल्या ग्लेजर समूहाने संघ विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.