जामखेड : चांगले काम करणाऱ्यांची दखल समाज घेत असतो. वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही केला जात असतो. असे उद्गार जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काढले. ते शिवराणा युथ प्रतिष्ठाने आयोजित केलेला पत्रकार सन्मान पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार यांच्या होते दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी यांना युवा पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रोहित पवार म्हणाले कि, समाजातील चांगले कार्य करणाऱ्या पत्रकार, शिक्षक, प्रगतशील शेतकरी, पाणलोट क्षेत्रात करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार होणे गरजेचे आहे. पत्रकारांनी आपल्या भागातील उत्कृष्ट कार्य करणारे प्रगतशील शेतकरी, शिक्षक समाज सुधारक, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीवर लिखाण करून समाजातील पीडित घटकाला न्याय मिळवून द्यावा, असे अवाहन त्यांनी केले.
दरम्यान जामखेड शहराला पाणी पुरवठ्यासाठी 117 कोटी रुपयांची मान्यता मिळाली असल्याचे ते म्हणाले. हि पाईपलाईन उजनी धरणातून करमाळा मार्गे 64 किलो मीटरची असणार आहे.
तसेच कर्जत-जामखेड तालुक्याना औद्योगिकीकरणासाठी शासकिय पातळीवर प्रयत्न चालू आहेत अशी माहिती त्यांनी दिली. कामामध्ये जनतेचा सहभाग असणे महत्वाचे आहे. एका विचाराने आपण विकास घडवून आणू असा विश्वासत्यांनी व्यक्त केला. आज अनेक पत्रकारांचा सन्मान शिवराणा युथ सामाजिक प्रतिष्ठानतर्फे केला. तसाच सन्मान समाजातील इतर कर्तूत्ववाण महिलांचाही व्हावा अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी पत्रकारांनी जामखेड येथे पत्रकार भवन उभारण्याची मागणी रोहित पवार यांच्याकडे केली. यावर आमदार रोहित पवार यांनी शासकिय मोकळ्या जागेचा शोध घेऊन, चांगल्या ले आऊट प्लॅनसह प्रस्ताव माझ्याकडे पाठवावा अशा सुचना दिल्या. पत्रकारांचा सन्मान केल्याबाबद्दल त्यांनी शिवराणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनराज पवार यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रा. मधुकर राळेभात,सुर्यकांत मोरे, नगरसेवक डिंगाबर चव्हाण, पवन राळेभात, अमित जाधव, अमित गंभीर,गजानन फुटाणे सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले,सुरज पवार ,लहू पवार,दिपक तुपेरे,रवि सोनवणे,राजन समिंदर ,मयूर भोसले,अमित जाधव, ताहेरभाई खान ,राजू गोरे,सचिन देशमुख ,सागर टकले,रवि साळुंके ,सुर्यकांत पवार ,विजय पवार ,आकाश साळुंके ,विकी साळुंके ,शुभम पवार ,मायकल साळुंके ,दिनेश साळुंके ,अल्ताब शेख,सोनु औचरे यांचेसह कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे, ओंकार दळवी, अविनाश बोधले, यासीन शेख, आशोक वीर, किरण रेडे, विजय जाधव ,अनील कष्टेकर, रवींद्र भापकर यांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना शिवराणा युथ सामाजिक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष धनराज पवार यांनी केले, तर संतोष गर्जे यांनी सुत्रसंचलन केले.