शिक्रापूर- ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही तत्पर असल्याची ग्वाही शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर यांनी दिली.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शिक्रापूर पोलीस स्टेशन व ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठल सासवडे, ग्रामसेवक संघटनेचे सचिव श्रीकांतदादा ढमढेरे, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. मच्छिंद्र गायकवाड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशीद, डॉ. शशिकांत भवर, डॉ. कांचन गुल्लाने, डॉ. मंजूषा सानप, डॉ. प्राजक्ता गायकवाड, सुरेश थोरात, प्रभाकर मुसळे, मधुकर शिंदे, अशोक जाधव, तुकाराम शिवले, बबन ढमढेरे, बळवंत वाबळे, सदाशिव शिवरकर, बबन आढाव, लक्ष्मण गायकवाड, दत्तराय के वटे, भीमराव वाघोले, नारायण मांढरे, अशोक कुदळे, संभाजी धुमाळ यांसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशीद यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना गरजेनुसार औषधांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर मुसळे यांनी केले. विठ्ठल सासवडे यांनी आभार मानले.