मेलबर्न – ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांमधील एक मानाची समजली जात असलेली ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा पुढील वर्षी जानेवारी महिन्यात रंगणार आहे. अर्थात, करोनाचा धोका असताना तसेच संपुष्टात आला असला तरीही खेळाडूंसाठीच्या जैवसुरक्षित वातावरणात व अत्यंत निवडक प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे, असे ऑस्ट्रेलिया टेनिस संघटनेने जाहीर केले आहे.
करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती कशी हातळली जाते, याचा आढावा घेतल्यावरच या स्पर्धेचे नियोजन केले जाणार आहे. प्रेक्षकांना या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी टेनिस कोर्टवर उपस्थित राहता येणार असले तरी आसन संख्येच्या 25 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाईल.