नवी दिल्ली: दिल्लीच्या सिव्हील लाईन्स भागातील नागरिकांना वीज बिलांची मोठी आकारणी करण्यात आल्याच्या कारणावरून तेथील नागरिकांचा एक मोर्चा भाजपच्यावतीने आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर काढण्यात आला होता. पण तो मोर्चा अलिकडेच अडवण्यात आल्यानंतर भाजप नेत्यांनी त्या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले.
या आंदोलनाचे नेतृत्व दिल्ली प्रदेश भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी केले. यावेळी आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून दिले.
केजरीवाल सरकारने ग्राहकांना फिक्स दराने जी वीज बिल आकारणी सुरू केली आहे ती रद्द करावी आणि ग्राहकांना वीज तोडण्याच्या ज्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्या मागे घ्याव्यात अशी मोर्चेकऱ्यांची मुख्य मागणी होती.