मुंबई – ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतील अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका ही अजरामर ठरली. आजही लोक ती मालिका आवर्जून सोशलमिडीयावर बघतात. या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून बाहेर पडून ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून अमोल कोल्हे यांनी संभाजी राजे यांची भूमिका साकारली. संभाजी महाराजांचा संपुर्ण जीवनप्रवास या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न कोल्हे यांनी केला.
दरम्यान, आता ही मालिका संपत आली असताना अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक खास व्हिडीओ शेअर करत ‘एक प्रवास कधीच न विसरता येणारा…’ असं कॅप्शन दिलं आहे.
एक प्रवास कधीच न विसरता येणारा…… pic.twitter.com/jrjgtZ9rVS
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 2, 2020
सुरू झालेला प्रत्येक प्रवास कधीना कधी संपणार हे निश्चितच असतं… काही प्रवास मात्र खुप काही देऊन जातात. कर्तव्यपुर्चीची अनुभुती आणि स्वप्नपूर्तीचा अनुभव देतात. असाच एक प्रवास काळजाच्या कप्यात जपून ठेवण्यासारखा छत्रपती संभाजी महाराजांची गाथा… स्वराज्यरक्षक संभाजी, असं व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे यांनी म्हंटलं आहे.