भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून डोक्‍यात वार

पुणे – भांडणे मिटवण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या रागातून एकाच्या डोक्‍यात वार करून जखमी केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.

बाळु ऊर्फ धर्मपाल ऊर्फ पिंट्या सोपान गवळी (वय 33, रा. रामवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी रवींद्र ऊर्फ पोपट रामा शिंदे (वय 31, रा. रामवाडी) याला अटक केली आहे. तर, आणखी एकावर गुन्हा दाखल आहे. याबाबत सागर गौतम अवदुत (वय 22, रा. चंदननगर) याने फिर्याद दिली आहे. ही घटना 12 एप्रिल रोजी रामवाडी जकातनाका परिसरात घडली.

अवदुत हे रामवाडी जकातनाका परिसरात असलेल्या एका पानशॉपवर थांबले होते. त्यावेळी तेथे जवळ असलेल्या वडापावाच्या गाडीवर गवळी, शिंदे आणि त्यांचा आणखी एक साथीदार वाद घालत होते. त्यावेळी अवदुत यांनी वाद घालु नका, असे त्यांना सांगितले. याच रागातून चिडून जावून आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच अवदुत यांचे दोन्ही हात धरून मंगेश याने हत्याराने त्यांच्या डोक्‍यात वार करून त्यांना जखमी केले, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी गवळी याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.