राजगुरूनगर (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमदार दिलीप मोहिते यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करोनाच्या महामारीमुळे अचानक रद्द झाले. मात्र, मंगळवारी (दि. 22) सकाळपासून दुपारपर्यंत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घराजवळ आणि त्यांच्या कार्यालयाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1336506526689049/
सन 2020-21 मध्ये होणारी सरकारी नोकर भरती किंवा शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा अंतरिम निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती तात्काळ उठवावी मराठा समाजाला आरक्षण कायम करावे या मागणीसाठी सकल मराठा समाज खेड तालुका हे मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली मंगळवारी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करणार होते.
मात्र, तालुक्यातील करोना विषाणू संसर्ग परिस्तिथी लक्षात घेता हे आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यामध्ये एक पोलीस उपाधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक तीन सहायक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, 2 राज्य राखीव पोलीस दलाची पथके यासह 150 पोलीस तैनात करण्यात आले होते.