मुंबई – ‘बिग बॉस’ फेम अभिनेता झीशान खान नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनेक फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतेच झीशानने त्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. यावरूनच त्याला ट्रोल केले जाऊ लागले. मात्र या फोटोवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटमुळे झीशान चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले.
झीशाने शेअर केलेल्या फोटोवर एकाने “झीशान दहशतवादी” अशी कमेंट केली. यावर संतापलेल्या अभिनेत्याने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. झीशाने उत्तर दिले की, “होय, कारण मी तुझ्यासमोर आलो ना तर तू खूप घाबरशील.” त्याच्या या उत्तराचे स्क्रीन शॉट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. त्याच्या या उत्तराचे चाहते देखील कौतुक करत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, झीशान खानने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ‘कुमकुम भाग्य’ मधून त्याला पहिल्यांदा ओळख मिळाली. त्यानंतर तो ‘बिग बॉस ओटीटी’मध्येही दिसला. झीशान शेवटचा एकता कपूरच्या ‘लॉक अप’ शोमध्ये दिसला होता. या शोने त्याला खूप प्रसिद्धी दिली होती.
झीशान खान ‘कुमकुम भाग्य’ मधील आलिया उर्फ रेहाना पंडितला डेट करत आहे. रेहाना झीशानपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. गेल्या वर्षीच या जोडप्याने त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते. वयातील फरकामुळे देखील त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.