ते घोषणापत्र नव्हे घोटाळेबाजपत्र – मोदी

अरुणाचलप्रदेश – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून काँग्रेसने येत्या निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर मंगळवारी घोषणापत्र जाहीर केले.यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारसारखे  कोणतंही खोटं आश्वासन देणार नाहीत असे म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीवर लक्ष्य केले या टीकेवर पंतप्रधान मोदी यांनी अरुणाचलप्रदेश येथील पिसघाटमध्ये जनसभेत काँग्रेसच्या घोषणापत्राला घोटाळेबाजपत्र अशी टीका केली.

दरम्यान जनसभेत मोदी यांनी टीका केली,’आम्ही गॅस देण्याचे आश्वासन नाही दिले होते तरी सुद्धा आम्ही ७ कोटी पेक्षा जास्त उज्जवला गॅस सिलेंडर लोकांना दिले. आरोग्याच्या नावावर मोठ्या गोष्टी नाही केल्या मात्र आम्ही आयुष्मान योजना लागू करून गरीब नागरिकांना मोफत उपचार दिला. एकीकडे हेतू प्राप्त करणारी सरकार आहे. तर दुसरीकडे घोटाळेबाजपत्र आहे जे खोट्या आश्वासनाने भरलेले आहे. या घोटाळेबाजपत्रापासून सावध रहा.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.