पिंपरी – भोसरी एमआयीडीसी परिसरातून दोन तरुणाचे मोबाईल दुचाकीवरुन येवून हिसकावून नेले आहेत. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक जण आरोपी हा अटकेत आहे.
याप्रकरणी ओंकार प्रकाश डफळपुरकर (वय-26 रा.पुनवळे, वाकड) व महेश बापू कांबळे (वय-22 रा. आकुर्डी) यांनी फिर्याद दिली असून यातील राजकुमार भवाने कामी व याला पोलिसांनी अटक केली असून दिनेश विके व दोन अज्ञात इसामांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार हा पायी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी येवून हिसकावून घेतला. तर महेश यांचाही असाच फोन हिसकावून नेण्यात आला. मात्र या गुन्ह्यातील आरोपी राजकुमार या आरोपीला अटक करण्यात आले आहे. या दोन्ही गुन्ह्यात मिळून 25 हजारांचे दोन फोन चोरीला गेले आहेत. याचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.