Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर केल्यानंतर देशभरात आचारसंहिताही लागू झाली. 543 जागांसाठी सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी तर शेवटच्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. 4 जून रोजी निकाल लागेल. मतदानापासून निकालापर्यंत 46 दिवस लागतील.
अशात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका नेत्याने शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावरून आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टीका केली नुकतेच सायन कोळिवाड्याचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी बिनकामाची माणसं जाऊद्या, त्यामुळे शिथिलता आलेला शिवसैनिक पेटून उठेल म्हटलं आहे. शिवसैनिकांशी संवाद साधताना बोलत होते.
Lok Sabha Election 2024 । नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
‘आपल्याला गद्दारांना गाडायचं आहे. मिंधे आणि भाजपला सांगतो दर आठवड्याला माझा एक माणूस फोडा, त्यामुळे शिथिलता आलेले शिवसैनिक पेटून उठतील. बिनकामाची माणसं जाऊद्या, एक-एक फोडण्यापेक्षा निवडणुका घ्या’ असं थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना केलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेल शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.