Deepa Parab Chaudhari and Ankush Chaudhari| अभिनेत्री दीपा परब चौधरीने झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याची एक गोड आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या सोहळयात महाराष्ट्र शाहीर आणि बाईपण भारी देवा या चित्रपटातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्यात अंकुश चौधरीला महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे.
तर अंकुशची पत्नी अभिनेत्री दीपा परबला देखील ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटासाठी गौरवण्यात आले आहे. दीपा परबसह ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील सुकन्या कुलकर्णी-मोने, दीपा परब, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि रोहिणी हट्टंगडी या अभिनेत्रींची मुख्य भूमिका आहे.
दीपाची पोस्ट –
‘दुग्धशर्करा योग..! 2023 हे वर्ष खूप सुंदर गेलंच पण 2024 ची सुरुवात देखील तितकीच सुंदर आणि आनंद देणारी आहे. यावर्षी झी चित्र गौरव 2024 या सोहळ्यात आम्हा दोघांनाही ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटांसाठी अवॉर्ड्स मिळाले आणि हे शक्य होण्यासाठी त्यामागील एकमेव दुवा म्हणजे यशस्वीपणे दोन्ही चित्रपटांची धुरा सांभाळणारा कॅप्टन ऑफ द शिप… दिग्दर्शक केदार शिंदे.’
View this post on Instagram
‘शाहिरांच्या भूमिकेसाठी अंकुशची निवड असो वा माझ्या इंडस्ट्रीतील कम बॅक साठी बाईपण सारखा चित्रपट तुझी दूरदृष्टी आणि आम्हा दोघांवरील विश्वास यामुळेच आज घरी परततांना 2-2 ट्रॉफिज हातात असतात. हे दोन्ही चित्रपट आणि ह्या असंख्य आठवणी नेहमीच आमच्या मनात घर करून राहतील,’ असे दीपाने पोस्टमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, यंदाच्या ‘झी चित्र गौरव 2024’ सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्रींनी उपस्थिती लावली होतो. अभिनेत्री सारा अली खानने यावेळी मराठीत संवाद साधत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं, तर शिल्पा शेट्टीने लावणीवर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा:
नाशिकमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवाराने स्पष्टच सांगतील,’शिंदे गटाला जागा देऊ नये नाही तर …’