eknath shinde, jaydev thackeray, shivsena – एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या लढाईतील आजचा दिवस मैलाचा दगड म्हणून गणला जाईल. आजपर्यंत एकनाथ शिंदे यांना, सेनेचे आमदार-खासदार, पदाधिकारी यांचे मोठ्या संख्येने समर्थन मिळताना दिसत होते. मात्र शिंदे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात मोठा करिष्मा करून दाखवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनाच गळाला लगावले आहे. जयदेव ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे सख्खे बंधू आहेत.
जयदेव ठाकरे यांनी बेकीसी मैदानातील शिंदे गटाच्या मेळाव्याला हजेरी लावली आहे. येथे एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आपल्या गटात स्वागत केले आहे. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांना एकूण तीन आपत्य असून त्यापैकी दिवंगत बिंदूमाधव सर्वात मोठे, जयदेव मधले तर उद्धव ठाकरे तिसरे मुलगे आहेत.
उद्धव ठाकरे व जयदेव ठाकरे यांच्यादरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून संपत्तीचा वाद देखील सुरु आहे. अशातच उद्धव ठाकरे व जयदेव ठाकरे यांच्यातील वाद सुरु असतानाच शिंदे यांनी त्यांना गळाला लावले आहे. शिवसेनेचे अनेक आमदार खासदार आपल्या गटात आल्यानंतर देखील शिंदे यांच्याकडे ठाकरे नावाचा ब्रँड नाही असं आजपर्यंत मानलं जात होत. मात्र जयदेव ठाकरे यांच्या प्रवेशाने शिंदे यांच्या गटात खुद्द बाळासाहेबांचे पुत्रच आले आहेत.