मुंबई – राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्र सरकारने देखील कोरोनावर मात करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा घटवण्यासाठी राज्य सरकारतर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशातच आज राज्य सरकारने कोरोनाविरोधातील लढ्याला बळकटी देण्यासाठी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आरग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार कोरोना उपचारांमध्ये गुणकारी ठरत असलेल्या रेमडेसिविरची १० हजार इंजेक्शन बांग्लादेशकडून खरेदी करणार आहे.
तत्पूर्वी, रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचा दावा अमेरिकेकडून कऱण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयानेही याआधी भारतात करोना रुग्णांवर रेमडेसिवीर औषधाची चाचणी केली जाणार असल्याचं सांगितलं होतं.
अशातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्र शासन रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जोदेखील कोरोना व्हायरसमुळे होतो”.
महाराष्ट्र शासन Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शन खरेदी करणार.प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जो देखील कोरोना व्हायरसमुळे होतो. 1/2@DrLahanetp @CMOMaharashtra @ChaiMIRROR
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 6, 2020
याबाबत अधिक माहिती देताना, “जागतिक आरोग्य संघटना करोनाच्या उपचारात त्याचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात असं सुचवते. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली आहे”. असं सांगितलं.
WHO सुचविते की Covid19 उपचारात त्याचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली.2/2@DrLahanetp @CMOMaharashtra @ChaiMIRROR
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 6, 2020