शहरातील 70 कंटेन्मेंट झोन झाले कमी…
पिंपरी (प्रतिनिधी) : शहरात करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरात निश्चित केलेले 70 प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) कमी झाले आहेत. तर, सध्या शहरातील 67 परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत. शुक्रवारी (दि. 5) रात्रीपर्यंत ही परिस्थिती होती.
करोनाचे रुग्ण ज्या परिसरात आढळतात तेथील परिसर महापालिका प्रशासनाकडून कंटेन्मेंट झोन म्हणून निश्चित केला जातो. तर, यापूर्वी कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केलेल्या परिसरातील करोनाचे रुग्ण बरे झाल्यानंतर संबंधित परिसर कन्टेन्मेंट झोनमधून काढण्यात येतो. प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्ण बरे झाल्याने महापालिका प्रशासनाने शुक्रवारी एकाच दिवशी 15 कन्टेन्मेंट झोन कमी केले. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण 70 कन्टेन्मेंट झोन कमी झाले आहेत. सध्या शहरातील 67 परिसरच कन्टेन्मेंट झोनमध्ये आहेत. कन्टेन्मेंट झोनमध्ये असलेला परिसर सील केलेला आहे. तेथे नागरिकांना प्रवेशबंदी आहे. तसेच, ये-जा करण्यास मज्जाव केलेला आहे.
शहरात आज दुपारपर्यंत एकूण 708 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील 416 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 58.76 टक्के इतके आहे. सध्या 280 सक्रिय रुग्ण आहेत. हे प्रमाण 39.55 टक्के इतके आहे. म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनेत जास्त आहे. आत्तापर्यंत शहरातील 12 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. टक्केवारीत हे प्रमाण 1.69 टक्के इतके अत्यल्प आहे.
कन्टेन्मेंट झोनमधून बाहेर पडलेले परिसर…..
कुंभार गल्ली-ओव्हाळ वस्ती-पुनावळे, ताथवडे चौक, जीवननगर-ताथवडे, खंडोबा माळ-भोसरी, पिंपळे सौदागर, नागेश्वरनगर-मोशी, शिवतेजनगर-थेरगाव, पडवळनगर-थेरगाव, गणराज कॉलनी, घरकुल-चिखली, गणेशनगर-दापोडी, क्रांतिवीरनगर-थेरगाव, पीएमटी चौक-भोसरी, बी.यू.भंडारी-दिघी, आदिनाथनगर-भोसरी, गुरुदत्त कॉलनी-भोसरी, रामराज प्लॅनेट-कासारवाडी, संभाजीनगर, शास्त्री चौक-भोसरी, रोडे हॉस्पिटल-दिघी, तनिष्क ऑर्किड-चऱ्होली, शिवनेरी कॉलनी-पिंपळे गुरव, नेहरुनगर बस डेपो, रुपीनगर, कावेरीनगर पोलीस लाईन-वाकड, गंधर्वनगरी-मोशी, खराळवाडी, तपोवन रोड-पिंपरी वाघेरे, 16 नंबर बसस्टॉप-थेरगाव, शिवाजी चौक-पिंपळे निलख, तनिष्क आयकॉन-दिघी, जगताप कॉम्प्लेक्स-पिंपळे गुरव, मधुबन सोसायटी-जुनी सांगवी, गणेशम सोसायटी-पिंपळे सौदागर, साठेनगर-चऱ्होली, शुभश्री आरएच सोसायटी- पिंपळे सौदागर, विनायकनगर-पिंपळे गुरव, बनकर वस्ती-मोशी, बजाज स्कूल परिसर-संभाजीनगर, न्यू एंजल्स स्कूल-ताथवडे, वुड्सविले-मोशी, काळेवाडी, मोहननगर, ताम्हाणे वस्ती, तापकीर चौक, निकम वस्ती-चऱ्होली, लांडगेनगर, कस्पटे वस्ती-वाकड, दत्तनगर-थेरगाव, गुरुविहार सोसायटी-भोसरी, हुतात्मा चौक-भोसरी, छत्रपती चौक-रहाटणी, बालघरे वस्ती-चिखली, चक्रपाणी वसाहत-दिघी, पवनानगर-जुनी सांगवी, शुभश्री-आकुर्डी, विकासनगर-किवळे, तांबे स्कूल-रहाटणी, फुगेवाडी, साई पॅरेडाईज-पिंपळे सौदागर, अंब्रेला गार्डन-संभाजीनगर, अमृतधारा-दिघी, ज्ञान आंगण सोसायटी-रहाटणी, हनुमान कॉलनी-भोसरी, क्षितिज डेस्टीनेशन-भोसरी, अलंकापुरम रोड-भोसरी, श्रीकृष्ण कॉलनी-रहाटणी, शरदनगर-चिखली, वाल्हेकरवाडी, आकाशराज-रावेत.