पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीइटी) गैरव्यवहार प्रकरणात अपात्र विद्यार्थ्यांना पात्र करण्यासाठी त्यांची माहिती व पैसे एजंटांकडे देणारा आरोपी कलीम गुलशेर खान (वय 52, रा. बुलडाणा) याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 28 एप्रिलपर्यंत वाढ केली.
या प्रकरणातील आरोपी एजंट संतोष हरकळ याच्याकडून जप्त लॅपटॉपमध्ये 1270 उमेदवारांची नावे, आसन क्रमांक आदी नोंदी असलेली “एक्सेल शीट’ मिळाली असून, त्यापैकी 1126 उमेदवारांचे गुण वाढविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापैकी कोणकोणत्या उमेदवारांशी संपर्क साधला, आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात दिली.