टेस्लाने भारतात उत्पादन सुरू करावे – राजीव कुमार

नवी दिल्ली – भारताने आयात शुल्क आणि इतर कर कमी करावेत अशी एक इलेक्‍ट्रिक कार निर्माण करणारी कंपनी टेस्लाने मागणी केली आहे. या कंपनीने भारतात कार उत्पादन सुरू केल्यास आवश्‍यक त्या कर सवलती या कंपनीला देण्यात येतील असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले.

या विषयावरील एका कार्यक्रमात बोलताना कुमार म्हणाले की, टेस्लाने इतर देशात तयार केलेल्या कार भारतात विकू नये. भारताला रोजगार निर्मितीची गरज आहे. त्यामुळे या कंपनीने भारतात कार तयार करून त्या भारतात विकाव्या. त्याचबरोबर या कारची निर्यात करावी. अगोदर भारताला कार निर्यात करू द्या असे टेस्लाचे म्हणणे आहे.

मात्र यामुळे भारताचा काहीही फायदा होणार नाही असे कुमार म्हणाले. या अगोदर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही टेस्ला कंपनीने भारतात कार निर्माण कराव्या असे आवाहन केले आहे. सध्या या इलेक्‍ट्रिक कार 110 टक्के इतका कर आहे. तो 40 टक्के करावा असे टेस्ला कंपनीचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.