बारामती: स्वतःच्या मुलाचा खून केलेला आरोपी तीन तासात ‘जेरबंद’

बारामती – स्वतःच्या मुलाचा खुन करुन पसार झालेला आरोपी ३ तासाचे आत जेरबंद करण्यात बारामती तालुका पोलिसांना यश मिळाले. तालुक्यातील पारडी येथे स्वतःच्या मुलाचा खून केल्याची घटना आज घडली. पारवडी गावचे पोलीस पाटील यांनी त्याबाबत फोनद्वारे पोलिसांना कळवले.

पारवडी गावचे हद्दीत शिपकुले वस्ती येथे कातकरी समाजाचे एका इसमाने स्वता:चे मुलाचा कोयत्याने डोक्यात वार करून खून केल्याची बातमी मिळताच पोलीस निरीक्षक ढवाण हे पोलीस स्टाफ घेवून घटना स्थळावर रवाना झाले. त्याठिकाणी पोहचले असता त्यांना अशी माहिती मिळाली की, आरोपी नामे मारुती साधुराम जाधव हा कातकरी समाजाचा माणुस मजुरी साठी पारवडी गावचे हददीत आला असून त्याने त्याचा सावत्र मुलगा गोपीनाथ मारुती जाधव याची घरगुती कारणावरुन भांडणातून जाधव याने स्वता:चे मुलाच्या डोक्यात लोखंडी धातुचे कोयत्याने डोक्यात व मानेवर वार करून खून करून पसार झाला.

त्यानंतर सदर आरोपी अटक करण्यासाठी गुन्हेशोध पथकाला आरोपी अटक करण्यासाठी सुचना दिल्या. परंतु सदर आरोपी अटक करणे पोलीसासाठी खुप कठीण काम होते. कारण सदर आरोपी हा अदिवासी समाजाचा असल्यामुळे तो मोबाईल वापर करीत नव्हता. तसेच त्याचे कोणी नातेवाईक वगैरे नसल्याने व सदर आरोपीची कोणतीही ओळख फोटो उपलब्ध नसलेने सदर आरोपी अटक करणे जिकीरीचे काम होते.

गुन्हेशोध पथकाने पोलीस निरीक्षक महेश ढवाण याचे सुचना प्रमाणे घटना स्थळापासुनचा वनविभागाचा १० ते १५ किमी चा टप्पा पायी सर्च करुन वनविभागातील झाडीत लपलेला आरोपीस अवघ्या ३ तासात ताब्यात घेतले. पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक ढवाण करीत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.